पंकजा मुंडे यांचा पराभव लागला जिव्हारी : युवकाची आत्महत्या, डिघोळ अंबा येथील घटना

टीम AM : पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने लातूर जिल्ह्यातील एका युवकाने एसटी बसखाली उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळ अंबा येथील युवकाने देखील पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने शेतातील झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पांडुरंग रामभाऊ सोनवणे [वय. 30 वर्षे, रा. डिघोळ अंबा ता. अंबाजोगाई] असं आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. 

बीड लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे या पराभूत झाल्या आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यात थेट अटीतटीची लढत पाहायला मिळाली होती. निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा विजय झाला आहे. हा निकाल 4 जून रोजी लागला होता. तेव्हापासून पांडुरंग हा अस्वस्थ होता. मात्र, त्याला गावातील युवकांनी आत्महत्या करू नकोस असं सांगितले होते. परंतू, आज दि.9 जून रोजी सकाळी त्याने स्वतःच्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. 

पांडुरंग याने आत्महत्या केल्याची घटना गावात पसरली. त्यानंतर युसुफवडगाव पोलीसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेचा पंचनामा केला. आजचं पांडुरंग यांच्या गावी डिघोळ अंबा येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पांडुरंग याचे 2016 ला लग्न झाले होते. मुलगा चंद्रकांत [वय – 8] तर मुलगी पूजा [वय – 11] आणि पत्नी ,आई – वडील असा परिवार आहे. पांडुरंग सोनवणे हा पंकजा मुंडे यांचा कट्टर समर्थक होता आणि तो ऊसतोड कामगार होता.

दरम्यान, या संदर्भात युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस मच्छिंद्र शेंडगे यांच्याशी संपर्क साधला असता पांडुरंग सोनवणे याने पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्यामुळे आत्महत्या केल्याची माहिती दिली आहे. 

घटनेनंतर पंकजा मुंडे यांचे ट्विट….