अंबाजोगाईत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, वाचा…

टीम AM : हवामान विभागानं वर्तविलेल्या अंदाजानुसार, अंबाजोगाई शहरांसह परिसरात सोमवारी दुपारी 2 च्या सुमारास विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. मागील काही दिवसांपासून प्रचंड उकाडा वाढल्याने नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, सोमवारी दुपारी आलेल्या पावसामुळं वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली.‌ 

आज दिनांक 21 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटात अंबाजोगाई शहरांसह तालुक्यात पावसाने झोडपले. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. 

दरम्यान, हाती आलेल्या माहितीनुसार अंबाजोगाई तालुक्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे शहरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. पावसामुळे शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचं मोठं नुकसान झाले आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे.