अवघ्या 10 मिनिटांच्या ऑडिशनने बदलले होते आर्चीचे नशीब : शाळेतही घेऊन जायची बॉडीगार्ड्स्, वाचा… 

टीम AM : 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’नंतर अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या आयुष्यात फार बदल झाले. मैलाचा दगड ठरलेल्या ह्या चित्रपटाने तिला आयुष्यामध्ये फार मोठ्या उंचीवर नेलं. आज त्याच रिंकू राजगुरूचा वाढदिवस आहे. रिंकूचा जन्म 3 जून 2001 रोजी झालेला आहे. आज ती आपल्या कुटुंबासोबत 23 वा वाढदिवस सेलिब्रेट करीत आहे. वयाच्या 15 व्या आणि 16  व्या वर्षी मुलं शालेय जीवनात मनसोक्त आनंद लुटत असतात. पण रिंकू त्या वयात कॅमेऱ्याच्या झगमगाटात होती. रिंकूला अवघ्या 10 मिनिटांच्या ऑडिशनमध्ये तिला पहिला चित्रपट कसा मिळाला, जाणून घेऊया….

सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे त्यांच्या कामानिमित्त अकलूज गावात गेले होते. दिग्दर्शक नागराज मंजुळे आपल्या गावात आल्याची बातमी कळताच रिंकू त्यांना पाहायला आपल्या मैत्रिणींसोबत गेली होती. त्यावेळी त्यांनी तिला 10 मिनिटांची ऑडिशन द्यायला सांगितली होती. तिने ती ऑडिशन दिली आणि त्यामध्ये तिची निवड झाली. या चित्रपटाने रिंकूला राज्यातच नाही तर देशभरामध्ये प्रसिद्धी मिळवून दिली. जेव्हा ‘सैराट’ रिलीज झाला तेव्हा रिंकू शालेय शिक्षण घेत होती. ती जेव्हा शाळेत जायची त्यावेळी तिच्यासोबत बॉडीगार्डही असायचे. खेळण्या बागडण्याच्या वयात रिंकू बॉडीगार्ड घेऊन फिरत होती, म्हणून तिची शाळेतल्या मुलांमध्ये एक ओळख होती.

इतक्या लहान वयात तिने फार मोठी प्रसिद्धी मिळवली होती. सैराटसाठी रिंकूला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. रिंकू 2017 मध्ये 10 वी उत्तीर्ण झालेली आहे. तिला 10 वीमध्ये, 66 टक्के इतके गुण मिळाले होते. तर 1२ वी मध्ये तिला कला शाखेतून 82 टक्के इतके गुण मिळाले. अभिनेत्री 12 वी 2019 मध्ये पास झाली. रिंकूने ‘सैराट’ नंतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तिने ‘कागर’ आणि ‘झिम्मा 2’ या सारख्या लोकप्रिय चित्रपटामध्ये काम केले असून एका वेबसीरीजमध्येही तिने काम केले होते. त्यासोबतच रिंकू ‘झुंड’ सारख्या लोकप्रिय चित्रपटातही ती दिसली होती.