धक्कादायक : ‘आयएएस’ अधिकाऱ्याच्या मुलीने इमारतीवरुन उडी घेऊन केली आत्महत्या

टीम AM : मुंबईत एका उच्चपदस्थ ‘आयएएस’ अधिकाऱ्याच्या मुलीने आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंत्रालयासमोरील इमारतीत तिने आत्महत्या केल्याची माहिती आहे. उच्च आणि तंत्र शिक्षणचे सचिव ‘आयएएस’ अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लिपी रस्तोगी असं या 26 वर्षीय मुलीचं नाव आहे

‘आयएएस’ अधिकारी विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी यांच्या मुलीने आत्महत्या केली आहे. मंत्रालयाच्या समोर एक सुनीती इमारत आहे, या इमारतीत काही ‘आयएएस’ अधिकारी राहतात तर काही मंत्री देखील राहतात. याच इमारतीत विकास रस्तोगी यांच्या मुलीने इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केली आहे. तिने हे टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. 

यामागे घरगुती कारण आसवं अशी शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येमागील कारण शोधण्याचं काम पोलीस करत आहेत.