अंबाजोगाई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त भारतीयांच्या कल्याणासाठी भारतीय संविधान, रिपब्लीकन आंदोलन, तथागतांचा धम्म व प्रबुद्ध जनाधार हे चार स्तंभ प्रदान केले आहेत. एकत्र येणे, विचार-विनिमय करणे, निर्णय घेणे व अंमलबजावणी करणे हे यशस्वीतेसाठीचे मापदंड त्यांनी दिले आहेत. राष्ट्र संचलनाचे सर्वात प्रभावी मॉडेल त्यांनी दिले आहे. आंबेडकरवादी विचारधारेत सर्वांच्याच सर्वांगीण कल्याणाचे सामर्थ्य आहे असे विचार ॲड. शामभाऊ तांगडे यांनी व्यक्त केले. संघर्षभूमी येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अयोजित विचार अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.
सुरुवातीस महीला भगीनींच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. या प्रसंगी प्रा. डॉ. गणेश सुर्यवंशी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रनिर्मितीचे कार्य या विषयावर विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन ॲड. संदीप थोरात यांनी केले.
या विचार अभिवादन कार्यक्रमास खंडेराव जाधव गुरुजी, संजय हातागळे, नरसिंग तरकसे, नारायण देशमाने, सौरभ जोगदंड, ॲड. चंद्रशेखर निकाळजे, प्रा किर्तीराज लोणारे, सविताताई लोणारे, विमलताई तांगडे, रेखाताई तरकसे, सुनीताताई सुर्यवंशी, दीक्षाताई कांबळे आदींची उपस्थिती होती.