किसानपुत्र आंदोलनाचे जानेवारीत लातूरला शिबीर

अंबाजोगाई : किसानपुत्र आंदोलनाचे दुसरे एक दिवसीय शिबीर 25 जानेवारी रोजी लातूर येथे होणार आहे. या शिबिरात प्रामुख्याने ‘शेतकरीविरोधी कायदे’ या विषयावर चर्चा होईल. अशी माहिती या शिबिराचे संयोजक ॲड. अनुप पात्रे यांनी दिली.

किसानपुत्र आंदोलन ही संघटना नसल्यामुळे याचे कोणी पदाधिकारी नाहीत. यात कोणाही किसानपुत्र व पुत्री यांना सहभागी होता येते. शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत हा या आंदोलनाचा एक कलमी कार्यक्रम आहे. शेतकऱ्‍यांच्या स्वातंत्र्याचे हे आंदोलन आहे.

25 जानेवारी रोजी लातूरच्या भालचंद्र ब्लड बँकेत हे शिबीर होईल अशी माहिती देऊन ॲड. अनुप पात्रे यांनी सांगितले की, या शिबिराला अमर हबीब (सिलिंग कायदा), अनंत देशपांडे (आवश्यक वस्तू कायदा), डॉ आशिष लोहे (शेतकरी आत्महत्या कारणे व उपाय) मकरंद डोईजड (शेतकरीविरोधी घटनादुरुस्त्या) व ॲड. रंजन राजगोर (अधिग्रहण कायदा) या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. 25 जानेवारी रोजी लातूर येथे होणाऱ्या या शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या किसानपुत्रांनी 8208878364 या क्रमांकावर आपले नाव नोंदवावे असे आवाहन करण्यात आले आहे.