खोलेश्वरच्या शिक्षकांचे रक्तदान करुन महामानवास अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबीर, अभ्यासिका व रॅलीचे आयोजन

अंबाजोगाई : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात शिक्षकांचे भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले. यात २८ शिक्षकांनी रक्तदान करून व रॅली आणि विद्यार्थ्यांसाठी ६ तास अभ्यासिकेच आयोजन करून महामानवास अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शैलेश कंगळे व प्रेमला खंडागळे हे होते. त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनातून विद्यार्थांनी प्रेरणा घेतांना त्यांनी ज्याप्रमाणे अभ्यास करून आपल्या जीवनात शिक्षणाला प्राधान्य दिले व त्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी केला. जो समाज सर्व सुविधापासून वंचित होता. समाजाची विस्कटलेली घडी बसविली, अन्यायाविरूद्ध लढण्यासाठी अनेक लढे उभारले, बौद्ध धर्माचा स्विकार करून पंचशील तत्वांचे व्रतस्थपणे पालन जीवनभर केले या विषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका सुनंदा धर्मपात्रे यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातून एकाग्रता, चिंतनशील वृत्ती या गुणांचा अंगिकार करावा. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महामानवास अभिवादन केल्यानंतर शहरातुन भव्य रॅली काढण्यात आली. याप्रसंगी स्थानिक समन्वय समिती अध्यक्ष ॲड. किशोर गिरवलकर, स्थानिक कार्यवाह बिपिन क्षीरसागर, शालेय समिती अध्यक्ष प्रा. शशिकांत टेकाळे, सदस्य तथा नगरसेवक डॉ. अतुल देशपांडे, उपमुख्याध्यापक राजू वखरे, पर्यवेक्षक अरुण पत्की, विभाग प्रमुख प्रशांत पिंपळे, अभ्यासपूरक मंडळ प्रमुख श्रीकांत देशपांडे, कार्यक्रम संयोजन राजेंद्र शेप, विवेक जोशी सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

या रॅलीसाठी आमदार नमिता मुंदडा, माजी आमदार रोमण साठे, माजी नगराध्यक्ष पापा मोदी आदी मान्यवरांनीही सहभागी होऊन प्रोत्साहन दिले. या रक्तदान शिबीरात शिक्षक, पालक मिळून २८ जणांनी रक्तदान केले. शाम वारकड, लक्ष्मण सुर्यवंशी, श्रीकांत देशपांडे, वैशाली देवगावकर, सुरेखा काळे, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.