टीम AM : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट आले आहे. मेच्या चाैथ्या आठवड्यात दहावीचा निकाल लागणार आहे. हेच नाही तर निकालाची तारीखही पुढे आलीये. 27 मे 2024 रोजी दहावीचा निकाल हा लागणार आहे. याला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दुजोरा दिला आहे.
राज्यात दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 यादरम्यान पार पडली. विशेष म्हणजे या परीक्षेची तयारी बोर्डाकडून जय्यत प्रकारे करण्यात आली. यंदा 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिलीये. आता विद्यार्थ्यांनी निकालाची प्रतिक्षा संपली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी हे लवकरच याबाबतचे अपडेट शेअर करतील. दहावीच्या निकालाचे जवळपास सर्वच काम पूर्ण झाल्याचे बोर्डाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलंय. दहावीचे विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.
mahahsscboard.in, mahresult.nic.in, msbshse.co.in या साईटवर जाऊन विद्यार्थी दहावीचा निकाल पाहू शकतात. अगोदर ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केला जाईल, त्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळेल. बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारलीये. आता दहावीच्या निकालात कोण बाजी मारते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.