टीम AM : बीड जिल्ह्यातल्या वडवणी, धारुर आणि अंबाजोगाई या तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा दुष्काळ, तर बीड, गेवराई, शिरुर, माजलगाव, केज, परळी, आष्टी आणि पाटोदा या तालुक्यातल्या महसुली मंडळांमध्ये, दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. या भागांना विविध सवलती लागू करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांनी दिली.
राज्यातील तालुक्यांमध्ये पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पीकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यांमध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेवून सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे.