टीम AM : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार आज संपत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराने आता जोर धरला आहे. या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांमध्ये, परवा 13 मे सोमवार रोजी मतदान होणार आहे.
या निवडणुकीसाठी लागणारे साहित्य, साधन – सामुग्री मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी काल मंत्रालयात पत्रकार परिषदेत ही महिती दिली.
या 11 मतदारसंघात एकूण 298 उमेदवार निवडणूक लढवत असून, एकूण 23 हजार 284 मतदान केंद्रांवर, 53 हजार 959 बॅलेट युनीट, 23 हजार 284 कंट्रोल युनीट आणि 23 हजार 284 व्हीव्हीपॅट यंत्राच्या आधारे, 2 कोटी 28 लाख 1 हजार 151 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.