टीम AM : रुग्णालयात गैरव्यवहार करणाऱ्या 11 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयनं अटक केली आहे. हे कर्मचारी, वैद्यकीय उपकरणं पुरवठादारांकडून पैसे घेणं, डॉक्टरांची भेट निश्चित करण्यासाठी रुग्णांकडून लाच घेणं तसंच बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र बनवणं असे प्रकार करत असल्याचं तपासात निष्पन्न झाल्यानं ही कारवाई करण्यात आली. नवी दिल्लीतल्या डॉ. राम मनोहर लोहीया रुग्णालयातील हे सर्व कर्मचारी आहेत.
सीबीआयनं 15 ठिकाणी छापे टाकून डॉक्टर्स तसंच पुरवठादारांविरुद्ध कारवाई करत 15 जणांविरुद्ध गुन्हे नोंदवले आहेत.
अलिकडच्या काळात डॉक्टर्स तसंच वैद्यकीय उपकरणं पुरवठादारांविरुद्ध करण्यात आलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे. गेल्या वर्षी गुन्हे अन्वेषण विभागानं दिल्लीत सफदरजंग रुग्णालयातल्या एका डॉक्टरला यासारख्याच एका गुन्ह्यासाठी अटक केली होती.