टी – 20 विश्वचषक : भारतीय संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूंची झाली निवड

टीम AM : 1 जूनपासून सुरू होत असलेल्या आयसीसी टी – 20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालच्या या संघात हार्दिक पंड्या उपकर्णधार असेल. यष्टीरक्षक ऋषभ पंतचं संघात पुनरागमन झालं असून, के. एल. राहुलला मात्र विश्रांती देण्यात आली आहे. 

उर्वरित संघात विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान यांची राखीव खेळाडू म्हणून निवड झाली आहे. 

यावेळी वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन केले जाणार असून, जगभरातल्या 20 देशांचे संघ यात सहभागी होणार आहेत.