झोपडीत माझ्या या ! बाहेरुन साधारण झोपडी, आतलं दृष्य… व्हिडिओ व्हायरल

टीम AM : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातले काही व्हिडिओ आपण पाहून विसरुन तर काही व्हिडिओ कायमचे लक्षात राहातात. काही व्हिडिओ आपल्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही असे असतात. जगात असंही घडू शकतं याचा अंदाज व्हिडिओ पाहिल्यानंतर येतो. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ वेगाना व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक महिला आपलं घर दाखवताना दिसतेय. बाहेरुन ही एक साधारण झोपडी असल्याचं पाहिला मिळतंय. पण आतलं दृष्य पाहून नेटकऱ्यांचे डोळ्यांवर विश्वास बसत नाहीए.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक मुलगी आपलं घर दाखवताना दिसतेय. बाहेरुन ही एक साधारण झोपडी वाटते. पण आतमध्ये या झोपडीत काय असेल याचा अंदाजही येणार नाही. पण जेव्हा ही महिला झोपडीतलं आतलं दृष्य दाखवते तेव्हा मात्र पाहणाऱ्यांचे डोळे विस्फारतात. हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. अनेक लोकांनी यावर मजेदार प्रतिक्रियाही दिल्यात. 

झोपडी आहे की महल

निळा सूट परिधान केलेली एक महिला एका झोपडीसमोर उभी असलेली दिसतेय. कॅमेरासमोर ती महिला आपल्या घराचं दर्शन घडवतेय. जसा कॅमेरा झोपडीच्या आत जातो तसं पहिल्या रुममध्ये एक मोठा बेड दिसतो. अलिशान हॉटेलमध्य असलेल्या बेडप्रमाणेच झोपडीतला हा बेड आहे. बेडसमोर एक कुलरही ठेवण्यात आलेला आहे, त्यानंतर ही महिला दुसरा दरवाजा उघडते. दुसरा रुम पहिल्या रुमपेक्षाही भव्य असल्याचं पाहायला मिळतं. दुसऱ्या रुमध्ये दोन मोठे बेड ठेवण्यात आले आहेत. रुममधील सामानही जागच्या जागी दिसंतय. इतकंच नाही तर या रुमला हवा आणि उन्हासाठी खिडक्याही आहेत. 

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ponu1432023 या नावाने शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 13 लाखाहून अधिक लोकांनी पाहिलाय. तर 54 हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे. व्हिडिओवर हजारो कमेंट्सही आल्या आहेत. अनेकांना हे घर आवडलंय. बाहेरुन घर झोपडीसारखं वाटत असलं तरी आतमध्ये महालापेक्षा कमी नाही, अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्यात.