टीम AM : ग्राहकांची दिशाभूल करणारी औषधांची जाहिरात प्रसिद्ध केल्या प्रकरणी पतंजलीनं दाखल केलेला माफीनामा सर्वोच्च न्यायालयानं आज तिसऱ्यांदा फेटाळला. न्यायालयानं बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना येत्या 30 एप्रिलला व्यक्तिशः हजर होण्याचे आदेश दिले आहेत.
लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या इतर कंपन्यांविरोधात केंद्रसरकारनं आतापर्यंत कोणती कारवाई केली, असा प्रश्नही न्यायालयानं विचारला आहे.
रुग्णांना हेतुपूर्वक महाग औषधं लिहून देणाऱ्या ॲलोपॅथी शाखेच्या डॉक्टरांची नोंदणी रद्द करण्याची तरतूद राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानं करावी, अशी सूचनाही न्यायालयानं केली आहे.