लोकसभा निवडणूक : शरद पवारांची 11 मे ला अंबाजोगाईत जाहीर सभा

टीम AM : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या प्रचार सभा मराठवाड्यात सुरू होणार आहेत. 23 एप्रिलपासून शरद पवार हे मराठवाडा दौऱ्यावर येत आहेत. 25 एप्रिल ते 11 मे दरम्यान शरद पवार यांच्या मराठवाड्यात चार सभा होणार आहेत. पैकी तीन एकट्या बीड जिल्ह्यात तर एक सभा छत्रपती संभाजीनगरात होणार आहे. 

शरद पवारांचा महाराष्ट्र दौरा जाहीर झाला आहे. या दौऱ्यात शरद पवारांच्या मराठवाड्यात चार सभा होणार आहेत. पैकी तीन सभा एकट्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यासाठी तर एक सभा छत्रपती संभाजीनगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यासाठी होणार आहे. 

25 एप्रिल रोजी शरद पवारांची पहिली सभा बीड लोकसभा मतदारसंघात माजलगाव येथे होणार आहे. त्यानंतर 1 मे ला छत्रपती संभाजीनगरात शरद पवार सभा घेणार आहेत. त्यानंतर 9 मे रोजी बीडमध्ये तर 11 मे रोजी अंबाजोगाईत सभा आयोजित करण्यात आली आहे.

शरद पवारांच्या सभा

◾25 एप्रिल – बीड – माजलगाव

◾1 मे – छत्रपती संभाजीनगर

◾09 मे – बीड

◾11 मे – बीड – अंबाजोगाई