हैद्राबाद येथील घटनेचा निषेध ; एकल महिला संघटनेचा मोर्चा

अंबाजोगाई : हैद्राबाद येथे एका महिला डॉक्टरवर काही नराधमांनी अत्याचार करून तिला जिवे मारून जाळल्याची घटना घडली. त्याचा निषेध करत त्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी आज दि. 5 डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता एकल महिला संघटनेच्या वतीने मोर्चा काढून उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी, महिलां मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

दिवसेंदिवस भारतीय समाज व्यवस्थेत स्त्रियावरील अत्याचारात वाढ होताना दिसत आहे. मानवी विकासासोबत माणसातील रानटीपणा हे कमी होण्याऐवजी त्यात सातत्याने वाढच होत आहे. या सर्व परिस्थितीमुळे मुलींच्या शिक्षणावर आणि मानसिक जडघडणीवर नकारात्मक परिणाम होताना दिसत आहे. डॉ. प्रियंका रेड्डी यांच्यावर जो अमानवीय अत्याचार झालेला आहे, त्यामुळे स्त्री वर्गात आणि विशेष करुन शिक्षण घेणाऱ्या मुलींमध्ये भितीचे आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. त्यातुन या स्त्री वर्गाला, मुलींना सावरणे आणि धिर देणे, सुरक्षा देणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी कॉ. बब्रुवान पोटभरे, अनिता कांबळे, आशा पांडे, ज्योती रपकाळ, चित्रा पाटील, शिंदेताई, परबती कसले, माया सगट, उषा यादव, वेजयंता काळुंके, शोभा घनगाव, अनिल ओहोळ, राम मोरे, सूरज वाघमारे, शुभम दिडवाने, राजेश पाटील यांच्यासह आदींची उपस्थिती होती.