टीम AM : छत्रपती संभाजीनगर शहरात छावणी परिसरातल्या एका कापड दुकानाला भीषण आग लागून एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू झाला. आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे
कपड्याच्या दुकानात चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक बाईकच्या चार्जरचा स्फोट झाल्यानं ही आग लागल्याचं अग्नीशमन दलानं सांगितलं.
वसीम शेख, आसिम वसीम शेख, परी वसीम शेख, तन्वीर वसीम, हमीदा बेगम, शेख सोहेल, रेश्मा शेख अशी मृतांची नावं आहेत. दुकानाला आग लागली तेव्हा हे सर्व वरच्या मजल्यावर झोपलेले होते. त्यामुळं त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.