टीम AM : राज्यातल्या 2 कोटी 12 लाख 55 हजार 35 शालेय विद्यार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यक असलेल्या आधार प्रमाणीकरणासाठी 30 मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली होती.
प्रत्यक्षात 1 कोटी 94 लाख 69 हजार 215 विद्यार्थ्यांचेच आधार वैध ठरले. तर 5 लाख 17 हजार 232 विद्यार्थ्यांनी अद्याप आधार क्रमांकच शिक्षण विभागाला उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळं नव्या सत्रातील गणवेशासह शालेय पोषण आहाराच्या निधीला कात्री लागून लाखो विद्यार्थ्यांना या दोन्ही लाभांपासून वंचित राहावं लागण्याची शक्यता आहे.
याची गंभीर दखल घेत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना गणवेश योजनेपासून वंचित ठेऊ नये, असे निर्देश शिक्षण विभागाला दिले आहेत.