भरधाव कार उपहारगृहात घुसली : तीन जण ठार, घटना सीसीटीव्हीत कैद

टीम AM : लातूर जिल्ह्यात औसा इथं भरधाव कार एका उपहारगृहात घुसल्याने झालेल्या अपघातात तीन जण ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. लातूर – औसा महामार्गावर औसा शहराजवळील ‘सीएनजी’ पंपाजवळ आज सकाळी हा अपघात झाला. 

वाजिद खान चांद खान पठाण आणि शेख सोहेल गफार अशी मृतांची नावं असून ओंकार कांबळे हा 14 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. मात्र, उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

औशाहून लातूरकडं भरधाव जाणारी चारचाकी रस्ता सोडून एका उपहारगृहाच्या दर्शनी भागात आदळल्यानं हा अपघात झाला. दरम्यान, कारमधील अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी औसा पोलिस अधिक तपास करीत आहेत.