टीम AM : धारुर तालुक्यात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. ऑटोरिक्षा व टिप्परची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमींना पुढील उपचारासाठी ‘स्वाराती’ रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. हा भीषण अपघात मंगळवार दि. 27 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास धारुर – तेलगाव रस्त्यावरील धुनकवड पाटीजवळ झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी प्रवाशी वाहतूक ऑटोरिक्षा धारूर कडून तेलगावंकडे जात असताना समोरून तेलगाव वरून धारूरकडे भरधाव वेगाने जात असलेल्या टिप्पर गाडीने [ क्र. एमएच – 24 एयू 5551] ऑटोरिक्षाला समोरासमोर जोराची धडक दिली. यात प्रवास करत असलेले संतोष बडे (वय 23), गवळण तिडके (वय 85) यांचा मृत्यू झाला आहे. अपघातात हौसाबाई घुले वय – 80 – रा. आंबेवडगाव, भागवत घुले वय – 60 रा. गावंदरा, संगीता रामा घोळवे वय – 40 रा. आंबेवडगाव, भागवत भांगे वय – 38 रा. गावंदरा हे गंभीर जखमी असून अतिदक्षता विभाग’ स्वाराती’ रुग्णालयात उपचार घेत आहेत, अशी माहिती मिळाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करित आहेत.