टीम AM : राज्यभरातील निवासी डॉक्टरांकडून पुन्हा राज्यव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे, आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने दिनांक 22 फेब्रुवारीपासून संध्याकाळी 5 वाजेपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. दरम्यान, निवासी डॉक्टरांच्या संपामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होताना दिसून येत आहे.
यापूर्वी देखील 7 फेब्रुवारीला संपावर जाण्याचा निर्णय निवासी डॉक्टरांकडून घेण्यात आला होता. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर संप स्थगित करण्यात आला होता. मात्र, आश्वासन देऊनही मागण्या पूर्ण होत नसल्याने कालपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. अंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील जवळपास 205 निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत, अशी माहिती ‘मार्ड’ चे अध्यक्ष डॉ. राहुल मुंडे यांनी दिली आहे.
निवासी डॉक्टरांच्या प्रमुख मागण्या…
- निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन हे प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे.
- निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात हॉस्टेलची व्यवस्था करण्यात यावी.
- निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन ही केंद्रीय संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनाप्रमाणे देण्यात यावे.