‘नमो महारोजगार’ मेळावा : 15 हजार युवकांना मिळतील नोकऱ्या 

टीम AM : लातूर इथल्या शासकीय तंत्रनिकेतन समोरील मैदानावर विभागीय मराठवाडास्तरीय ‘नमो महारोजगार’ मेळाव्याचं उद्या उद्घाटन होणार आहे.

दोन दिवसीय या मेळाव्यात 208 खाजगी कंपन्या बेरोजगार युवकांच्या मुलाखती घेणार असून, जवळपास 15 हजार युवकांना नोकऱ्या मिळतील, असा दावा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. 

निलंगेकर आज लातूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. या मेळाव्यात रोजगारासोबतचं युवकांना करिअर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त युवक – युवतींनी या ‘नमो महारोजगार’ मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.