टीम AM : अंबाजोगाई शहरात एक खळबळजनक घटना घडली आहे. बंदुकीचा आणि चाकूचा धाक दाखवित अज्ञात चोरट्यांनी 40 लाख रुपये लंपास केले आहेत. ही घटना शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी रात्री 8 ते 9 च्या सुमारास मुकुंदराज कॉलनीत घडली आहे. दरम्यान, पैसे घेऊन अज्ञात चोरटे फरार झाले असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. या घटनेमुळे अंबाजोगाईत एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, राजू धनराज मोरे यांची नवा मोंढा, बँक ऑफ बडोदा समोर, राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्था आहे. नित्यनियमाने पतसंस्था बंद झाल्यानंतर पतसंस्थेची कॅश घेऊन मॅनेजर काकडे हे मुकूंदराज कॉलनी येथील मोरे यांच्या घरी आले. ही 40 लाखांची कॅश दोन बॅगमध्ये आणली गेली होती. काकडे हे घरी आले की, अज्ञात तीन चोरट्यांनी घरात प्रवेश करित त्यांना बंदुकीचा धाक दाखविला व गळ्याला चाकू लावून सुमारे 40 लाख रुपयांची कॅश बॅगेसहीत घेऊन पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा अधिक तपास अंबाजोगाई शहर पोलीस करित आहेत.