टीम AM : महाराष्ट्रात येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावं लागणार नाही. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जळगाव इथं ही घोषणा केली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात योगशास्त्र विभाग आणि शिक्षणशास्त्र विभाग इमारतीचं उदघाटन पाटील यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी, अशा विविध प्रकारच्या सध्या सुरू असलेल्या 642 आणि नव्याने सुरु होणारे 200 अभ्यासक्रम अशा एकूण 842 अभ्यासक्रमांसाठी ही शैक्षणिक शुल्क सवलत लागू असेल, असे त्यांनी सांगितले.
जर्मन देशाला कौशल्य असलेल्या 4 लाख मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने जर्मन भाषा शिकवण्यापासून ते थेट जर्मनीत जाण्यापर्यंतचा खर्च घेण्याची जबाबदारी उचलली आहे. त्यामुळे जर्मन भाषा शिकण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा असंही पाटील यांनी सांगितलं.