टीम AM : राज्यातील शासकिय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी प्रशासन आणि शासन गेल्या वर्षीपासून तोंडी आश्वासने देत आहेत, डॉक्टरांच्या मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने राज्यातील सर्व निवासी डॉक्टर बुधवारी (दि. 7) बेमुदत संपावर जाणार आहेत.
सेंट्रल ‘मार्ड’ ने गेल्या वर्षी 3 जानेवारीला संप मागे घेतला होता. परंतू, आज त्या आश्वासनाला 393 दिवस उलटून गेले आहेत, तरीही मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे निवासी डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले आहे. अंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील जवळपास 205 निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत, अशी माहिती ‘मार्ड’ चे अध्यक्ष डॉ. राहुल मुंडे यांनी दिली आहे.
निवासी डॉक्टरांच्या मागण्या
वसतिगृह निवास :
कनिष्ठ आणि वरिष्ठ निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा वसतिगृह निवासाची उपलब्धता करण्यात यावी.
स्टायपेंडचे नियमितीकरण :
आजपर्यंतचे थकीत स्टायपेंड मंजूर करून दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत निवासी डॉक्टरांच्या बँक खात्यांमध्ये स्टायपेंडचा भरणा करण्यात यावा.
स्टायपेंड वाढ :
केंद्रीय संस्थांप्रमाणेच स्टायपेंडचे पेमेंट देण्यात यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.