टीम AM : परीक्षांमध्ये होणारा वाढता गैरप्रकार आणि पेपर फुटीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारकडून पाऊले उचलण्यात येत आहे. आता लवकरच पेपर लिक करणाऱ्यांना आळा बसणार आहे. पेपर फोडल्यास आता कठोर शिक्षेची तरतूद करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने संसदेत विधेयक सादर केलं आहे.
पेपर लीक करणाऱ्यांना चाप !
लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षा (अन्याय प्रतिबंधक) विधेयक 2024 सादर करण्यात आलं. या विधेयकानुसार पेपर लीक प्रकरणात दोषी आढळल्यास 10 वर्षांचा कारावास आणि एक कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, दुसऱ्याच्या जागी डमी परीक्षार्थी बनून परीक्षा दिल्यास तीन ते पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.