टीम AM : उत्तरेककडून मोठ्या प्रमाणात थंड वारे येत असल्याने राज्यातील अनेक भागात तापमानात घट होणार आहे. त्यामुळे पुणे, मुंबई, सातारा, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यात थंडी वाढणार आहे. तसंच विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही थंडीत वाढ होणार आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे पुण्यात किमान तापमानात 3 डिग्री सेल्सिअसने घट होऊ शकते. तसंच 4 ते 6 फेब्रुवारीला कमान तापमानात घट होईल. त्यामुळे दिवसाही गारठा जाणवणार आहे.
तामिळनाडू किनारपट्टीपासून ते मराठवाडा – विदर्भ असा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यासोबतच हिमालयापासून आसामपर्यंत काही राज्यांमध्ये बर्फवृष्टी सुरू आहे. उत्तर भारतात किमान तापमान आणखीच घट झाली आहे. त्यामुळे राज्यात थंडीची लाट पसरली आहे. सध्या उत्तर भारतात झोतवारा (स्ट्रीम विंन्डस)) वाहत आहे. हा वारा हिवाळ्यात पूर्वेकडे वाहतो. हवेच्या वरच्या थरात हा वारा मराठवाडा – विदर्भातही वाहत आहे. यामुळे थंडी वाढत आहे.
पुण्यात तापमानात मोठी घट होण्यास सुरूवात झाली आहे. पुणे शहरातील किमान तापमानात गेल्या 24 तासांत 4 ते 6 अंशांनी घट झाली आहे. तर, जिल्ह्यात तब्बल 5 अंशांनी घट झाली आहे. देशात पश्चिमी झंझावात सक्रिय असल्यामुळं उत्तरेच्या राज्यांमध्ये होणाऱ्या पाऊस आणि बर्फवृष्टीचे परिणाम राज्यातील हवामानावरही होताना दिसणार आहेत. पुढील चार-पाच दिवस ही थंडी आणखी वाढणार आहे.