टीम AM : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून बोगस निधी मिळवण्याचा प्रयत्न केल्यास मोठी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली आहे.
या वैद्यकीय सहाय्यता निधीचा गैरउपयोग होऊ नये, यासाठी एका पथकाद्वारे राज्यभरातल्या रुग्णालयांमध्ये अचानक भेटी देत कामकाजाचा आढावा घेतला जात आहे.
यासंबंधी कुठल्याही रुग्णालयात अनुचित प्रकार आढळल्यास रुग्णांनी किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी थेट मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाशी संपर्क साधावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.