वीजवाहक तारांशी संपर्क झाल्यामुळे 2 मजुरांचा मृत्यू

टीम AM : परळी शहराजवळ वाघबेट इथे वीजवाहक तारांशी संपर्क झाल्यामुळे 2 मजुरांचा मृत्यू झाला तर 2 मजूर गंभीर जखमी झाले. आज दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 

हे मजूर ओडिसा जिल्ह्यातले असून गोविंदा धवन सिंग आणि संदीप डाक्टर अशी मृत मजुरांची नावं आहेत. 

बोअरवेल खोदण्यासाठी आलेल्या गाडीचा वीजवाहक तारांशी संपर्क आला आणि वीजेचा प्रवाह गाडीत उतरल्यामुळे ही दुर्घटना घडली. जखमी मजुरांवर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.