टीम AM : ‘मुसाफिरा’ चित्रपटातील तिसरे गाणे सोशल मीडियावर झळकले आहे. ‘झिलमिल’ असे या गाण्याचे बोल असून हे गाणे सलीम मर्चंट यांनी गायले आहे. या गाण्याचे बोल अदिती द्रविड हिचे असून साई – पियुष यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे.
स्कॉटिश हायलँड्सच्या निसर्गरम्य वातावरणात हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी यांची मैत्री या गाण्यातून समोर येत आहे.
गाण्याबद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात, स्कॉटिश हायलँड्सच्या एका सुंदर ठिकाणी आम्ही याचे चित्रीकरण केले आहे. कोणीही प्रेमात पडेल असे हे स्थळ आहे. हे गाणे ऐकताना आणि पाहताना आपण स्वतःही तिथेच असल्याचा भास होईल. ही सफर आमच्यासाठीही खूप खास होती. आनंद पंडित मोशन पिक्चर्स, ऐश मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने, नितीन वैद्य प्रोडक्शन आणि गुझबम्प्स एंटरटेन्मेंट प्रस्तुत हा चित्रपट आहे.