टीम AM : टीप्स फिल्म मराठी हे मनोरंजनाच्या दुनियेतील एक मोठे नाव ! ‘श्रीदेवी प्रसन्न’ या सिनेमातून त्यांनी आता मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला आहे. सिनेमावेड्या फॅमिलीज ही ह्या सिनेमाची एक थीम आहे आणि म्हणूनच काही हिंदी गाणी हटके पद्धतीने ह्या चित्रपटाचा भाग बनली आहेत.
‘देखा जो तुझे यार’ हे टिप्सचंच गाणं वेगळ्या ढंगात पेश केलं गेलं आहे आणि त्याचा लाँच इव्हेंट पार पडला आहे. या चित्रपटात सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांची जोडी आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल विमल मोढवे आणि लेखन अदिती मोघे यांचे आहे.
चित्रपटात सुलभा आर्य, संजय मोने, वंदना सरदेसाई, शुभांगी गोखले, रमाकांत दायमा, सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, राहुल पेठे, पल्लवी परांजपे, पूजा वानखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे हे कलाकार देखील आहेत.