भरधाव वेगातील ट्रकच्या धडकेत वृध्दाचा मृत्यू : मगरवाडी फाट्यावर घडली घटना

टीम AM : अंबाजोगाई शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मगरवाडी फाट्यावर अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगातील ट्रकने एका वृध्दाला जोराची धडक दिल्याने वृध्दाचा जागीच मृत्यु झाला आहे. हा अपघात आज दिनांक 13 जानेवारीला दुपारी 1 ते 2 च्या सुमारास झाला. भानुदास अप्पासाहेब नांदवटे [वय – 70 वर्ष, रा. दौनापूर] असं मृत झालेल्या वृध्दाचं नाव आहे. 

या बाबत प्राप्त माहिती अशी की, अंबाजोगाई – घाटनांदूर रस्त्यावरील मगरवाडी फाट्याजवळ ट्रक क्रमांक एमएच 50 – 0697 च्या चालकाने मयत भानुदास अप्पासाहेब नांदवटे यांना पाठीमागून ट्रकची जोराची धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यु झाला. दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला.

या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात भिमराव भानुदास नांदवटे [वय – 50 रा. दौनापूर] यांच्या फिर्यादीवरुन ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस हे. कॉ. तुकाराम मुरकुटे हे करित आहेत.