टीम AM : अजमेर येथील 812 व्या उर्स करिता होणारी गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे नांदेड – अजमेर विशेष रेल्वेगाडीची एक फेरी वाढवणार आहे. 15 जानेवारीला ही रेल्वे सकाळी साडेआठ वाजता नांदेड इथून सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी साडेसात वाजता अजमेरला पोहचेल.
परतीच्या प्रवासात 20 जानेवारीला ही रेल्वेगाडी रात्री अकरा वाजून वीस मिनीटांनी अजमेर स्थानकावरून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता नांदेड स्थानकावर पोहचेल.
दरम्यान, नांदेड विभागात काही तांत्रिक कारणांमुळे निझामाबाद – पुणे डेमू ही रेल्वेगाडी 13, 15 आणि 20 जानेवारीला निझामाबाद इथून निर्धारित वेळेच्या अडीच तास उशिरा, तर नगरसोल – नरसापूर ही रेल्वेगाडी 13, 16, 20, 23, 27 जानेवारीला तिच्या निर्धारित वेळेच्या एक तास उशिरानं सुटणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.