उपजिल्हाधिकार्यांना दिले निवेदन
अंबाजोगाई : दिल्ली येथील जवाहरलाल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यावरील सततच्या दडपशाहीचा अंबाजोगाईत जाहिर धिक्कार करण्यात आला. संपुर्ण देशात एक समान दर्जेदार मोफत शिक्षण मिळावे यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. या विषयी उपजिल्हधिकारी अंबाजोगाई यांना शनिवार,दि. 23 नोव्हेंबर रोजी निवेदनही देण्यात आले.
उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे शिक्षण क्षेत्रात प्रचंड विषमतेची दरी निर्माण झालेली आहे. गरीबांना वेगळे शिक्षण व श्रीमंत वर्गाना वेगळे शिक्षण अशी असमान शिक्षण पध्दती निर्माण होवुन खाजगी शिक्षण हे नफा कमविण्याचे एक साधन बनले आहे. शिक्षण घेणे तमाम मानवजातीचा जन्मसिध्द हक्क आहे. शिक्षण देण्याची जिम्मेदारी ही सरकारची असून सरकारने शिक्षणाचा आज धंदा सुरु केलेला आहे. यामुळे देशातील मागास, अतिमागास, गरीब समुहांना शिक्षणापासून कायमचे दुर करण्याचा हा डाव असून तो डाव जवाहरलाल नेहरु विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांनी ओळखलेला आहे. म्हणुन जे.एन यु.मध्ये सुध्दा वार्षिक 8,000 रुपयांची फिस 50,00 रुपये करण्यात आलेली आहे. ज्यामुळे जे.एन.यु. मध्ये सामान्य घरातील व मागास अतिमागास जनसमुहातील मुले – मुली शिक्षण घेवु शकणार नाहीत. म्हणुन त्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरु केले. जे.एन.यू.चे लोकशाही मार्गाने चालु असलेले आंदोलन उपकुलगुरुनीं समोर येवुन विद्यार्थ्यांशी चर्चा करुन मिटविण्याच्या ऐवजी त्या विद्याथ्यार्ंवर सलग तीन दिवस पोलिस आणि केंद्रीय पोलिस दल अंगावर सोडुन रानटी व निघृण पध्दतीने मुलां-मुलीनां मारहाण करुन जखमी करण्यात आले आहे. काही मुला मुलीनां पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. ही दडपुशाही सरकारने ताबडतोब बंद करावी याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील.
या निवेदनाद्वारे मागणी करतो की, देशातील संपूर्ण शिक्षण हे सर्वांना मोफत केले पाहिजे. जे.एन.यु.च्या विद्यार्थ्यांच्या आदोलंनास व त्यांच्या रास्त मागण्यास आम्ही जाहीर पाठींबा व्यक्त करीत आहोत. याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे. सदरील निवेदनावर कॉ.बब्रुवाहन पोटभरे, धिमंत राष्ट्रपाल, दत्ता उपाडे, अॅड.इस्माईल गवळी, पांडुरंग जोगदंड, संजय वाघमारे, कल्याणी गंडले, राजू काळुंके, किशोर कांबळे, किशोर आवाडे, अक्षय भुंबे, मयुर कांबळे, परमेश्वर लांडगे, स.का.पाटेकर, नितीन सरवदे, दिपक उपाडे, धिरज वाघमारे, धिरज आवाडे, आकाश मोरे, दिलीप शिंदे आदींसहीत कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्या आहेत.