खोलेश्‍वर महाविद्यालयाने पटकावले उपविजेतेपद

अंबाजोगाई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व भारत बी.पी.एड. महाविद्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन बॉलबॅडमिंटन स्पर्धेत खोलेश्‍वर महाविद्यालयाने उपविजेते पद पटकावले. या स्पर्धा दि. 18 नोव्हेंबर 2019 रोजी जालना येथे पार पडल्या.

ऑल इंडिया नॅशनल कँम्पसाठी याच संघातील सहभागी खेळाडू कृष्णा रमेश मुदगुलकर, विष्णु गोविंद केंद्रे, आदित्य शतानंद माले या तीन विद्यार्थ्यांची निवड झाली. या खेळाडूंना प्रा. राहुल चव्हाण, प्रा. पोखरकर व प्रा.खांडेकर यांनी मार्गदर्शन केले.

या स्पर्धेमध्ये खोलेश्‍वर महाविद्यालयाने मिळविलेल्या या उज्वल यशाबद्दल भाशिप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलुरकर, कार्यवाह नितीन शेटे, सहकार्यवाह प्रा.चंद्रकांत मुळे, डॉ. हेमंत वैद्य, स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.किशोर गिरवलकर, कार्यवाह बिपीन क्षीरसागर, महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष रामभाऊ कुलकर्णी, प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे, उपप्राचार्य डॉ. मुकुंद देवर्षी, डॉ. बी.व्ही. मुंडे, प्रा. सुहास डबीर, प्रा. अजय चौधरी यांनी क्रीडा शिक्षक आर. एम. चव्हाण, प्रा. पोखरकर व सहभागी खेळाडू यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.