वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
टीम AM : राज्यातल्या वैद्यकीय शिक्षण विभागातली वर्ग तीनची पदं डिसेंबर अखेरपर्यंत तर वर्ग एक आणि दोनची पदं येत्या एप्रिलपर्यंत भरण्यात येतील, अशी माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य सुभाष थोटे यांनी यासंदर्भातला प्रश्न विचारला होता.
ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांची संख्या वाढल्याचा मुद्दा राजेश टोपे यांनी उपस्थित केला. बोगस डॉक्टर शोधून काढण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल आणि ही मोहीम सातत्याने राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तसंच पालिका आयुक्तांना दिल्या जातील, अशीही माहिती मुश्रीफ यांनी दिली.
अंगणवाडी सेविका आंदोलन करत असल्याचा मुद्दा सदस्य प्रकाश आबिटकर यांनी मांडला. त्यावर मंत्री गिरीष महाजन यांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचं मानधन नुकतंच 25 टक्के वाढवलं असल्याचं सांगितलं. यावर काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी आक्षेप घेतला.