नागपूरात भीषण स्फोट : सहा महिलांसह 9 जणांचा मृत्यू 

टीम AM : नागपुरातील बाजार गाव येथे सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या कंपनीत दारूगोळा बनवण्याचे काम सुरू असताना हा स्फोट झाला. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.

यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत घटनेबद्दल दुखः व्यक्त केलं. यासोबतच त्यांनी पीडितांना मदत देखील जाहीर केली.

सोलार कंपनी भारतातील अनेक संरक्षण क्षेत्राशी संबंधीत कंपन्यांना दारुगोळा पुरवठा करते. ‘एक्सप्लोझिव्ह’ मध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर होत असतो. हेच काम करत असताना आज स्फोट झाला. नऊ मृतांमध्ये युवराज चरोदे, ओमेश्वर मछिर्के, मिता युकी, आरती सहारे, श्वेताली मारबते, पुष्पा मनपुरे, भाग्यश्री लोणारे, रुमिता युकी, मोसम पटले यांचा समावेश आहे.