राज्यात दुष्काळाची परिस्थिती भीषण : 2600 कोटींची मदत मिळण्याची शक्यता 

टीम AM : राज्यात दुष्काळाची परिस्थिती भीषण असल्याचं निरीक्षण केंद्रीय पथकाने नोंदवलं आहे. या दुष्काळ पाहणी पथकाची, आढावा बैठक काल पुण्यात विधानभवनात झाली. 

याबाबत येत्या दोन – तीन दिवसांत अहवाल तयार करून तो केंद्राला पाठवला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 2600 कोटींची मदत मिळण्याची शक्यता आहे. 

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी केंद्राकडून राज्याला मदत मिळावी, अशी अपेक्षा राज्यातल्या अधिकाऱ्यांनी पथकाकडे व्यक्त केली आहे.