मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष : अवघ्या 17 महिन्यांमध्ये तब्बल 156 कोटींपर्यंत अर्थसहाय्य

19 हजाराहूंन अधिक रुग्णांचे वाचले प्राण

टीम AM : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामुळं अनेक रुग्णांना जीवनदान मिळत असल्यानं ही योजना आता राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना ठरत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. 

या योजनेमुळे गोर – गरीब तसंच गरजू नागरिकांचे प्राण वाचत असून मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण मदतीविना वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षानं अवघ्या 17  महिन्यात 19 हजारांहून आधिक गोरगरीब आणि गरजू रुग्णांना एकूण 156 कोटी 60 लाख रुपयांचं अर्थसहाय्य केलं आहे. या योजनेचा अधिकाधिक गरजूंनी लाभ घ्यावा आणि त्यासाठी 8650567567 या नि:शुल्क क्रमांकावर संपर्क करावा, असं आवाहन या कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी केलं आहे.