कमल हासनशी घटस्फोट : हातात 60 रुपये अन् एक गाडी, वाचा सारिकाची कहाणी…

टीम AM : बाहेरून झगमगाटी दिसणाऱ्या या मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार आले, ज्यांनी इथे टिकून राहण्यासाठी प्रचंड संघर्ष केला. या प्रवासात त्यांना केवळ व्यावसायिकच नव्हे, तर वैयक्तिक संघर्ष देखील करावा लागला होता. अशाच कलाकारांपैकी एक नाव आहे सारिका ठाकूर. कमल हासनशी लग्नगाठ बांधणारी सारिका आज मात्र एकाकी जीवन जगत आहे. सारिकाचा जन्म 5 डिसेंबर 1960 रोजी दिल्लीत झाला होता. सारिका लहान असताना तिचे वडील तिच्या कुटुंबाला सोडून निघून गेले. घरची परिस्थिती बेताची असल्याने सारिकाला बालपणापासूनच प्रचंड संघर्ष करावा लागला होता.

वडिलांच्या पाठीमागे घराची धुरा सारिकावर आली होती. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी सारिकाला मनोरंजन विश्वात पाय ठेवावा लागला. तिच्या आईनेच तिला काम करायला पाठवलं होतं. बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सारिकाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘रजिया सुलतान’, ‘कैसे कैसे लोग’, ‘बडे दिल वाले’, ‘नास्तिक’ आणि ‘मैं कातील हूं’ सारख्या चित्रपटांमध्ये सारिकाने भूमिका केल्या. सारिकाचे करिअर यशाच्या शिखरावर असतानाच तिने साऊथ स्टार कमल हासनसोबत लग्नगाठ बांधली होती. सारिकाशी लग्नगाठ बांधणाऱ्या कमल हासनचे हे दुसरे लग्न होते. या आधी त्यांनी अभिनेत्री वाणी गणपतीशी लग्न केले होते. मात्र, काही वर्षांतच दोघांचा घटस्फोट झाला होता.

वाणीशी घटस्फोटानंतर कमलच्या आयुष्यात सारिकाची एंट्री झाली. सारिकाला पहिल्यांदा बघताच कमल हासन तिच्या प्रेमात पडला होता. दोघांनी लग्न केल्यांनतर श्रुती आणि अक्षरा हासन अशा दोन मुलींना जन्म दिला. मात्र, त्यानंतर कमल आणि सारिका यांच्या नात्यात देखील वाद सुरू झाले. हळूहळू त्यांच्यातील नाते इतके बिघडले की, त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. कमल आणि सारिका यांनी 2004 मध्ये घटस्फोट घेतला. कमल हासनपासून घटस्फोट घेतल्यानंतर सारिकाच्या दोन्ही मुलींनीही आपल्या आईची साथ सोडली. श्रुती आणि अक्षरा यांनी वडिलांची निवड करून त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.

सारिकाशी लग्नगाठ बांधणाऱ्या कमल हासनचे हे दुसरे लग्न होते. या आधी त्याने अभिनेत्री वाणी गणपतीशी लग्न केले होते. मात्र, काही वर्षांतच दोघांचा घटस्फोट झाला होता. वाणीशी घटस्फोटानंतर कमलच्या आयुष्यात सारिकाची एंट्री झाली. सारिकाला पहिल्यांदा बघताच कमल हासन तिच्या प्रेमात पडला होता. दोघांनी लग्न केल्यांनतर श्रुती आणि अक्षरा हासन अशा दोन मुलींना जन्म दिला. मात्र, त्यानंतर कमल आणि सारिका यांच्या नात्यात देखील वाद सुरू झाले. हळूहळू त्यांच्यातील नाते इतके बिघडले की, त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. कमल आणि सारिका यांनी २००४ मध्ये घटस्फोट घेतला. कमल हासनपासून घटस्फोट घेतल्यानंतर सारिकाच्या दोन्ही मुलींनीही आपल्या आईची साथ सोडली. श्रुती आणि अक्षरा यांनी वडिलांची निवड करून त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.

जेव्हा त्यांचा घटस्फोट झाला, तेव्हा सारिकाकडे अवघे 60 रुपये आणि एक कार होती. याचा खुलासा स्वतः सारिकाने केला होता. याच कारमध्ये ती रात्रभर राहायची. सकाळी मैत्रिणींच्या घरी आंघोळ करायची. पण, सारिकाने कधीही कोणाकडे मदत मागितली नाही. तिने पुन्हा एकदा नव्याने कामाला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा गेलेलं वैभव परत मिळवलं.