टीम AM : एबी इंटरनॅशनल, म्हाळसा एंटरटेनमेंट आणि लंडन मिसळ लिमिटेड प्रस्तुत जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट 8 डिसेंबरला प्रदर्शित होईल. भरत जाधव यांनी पहिल्यांदाच चित्रपटासाठी रॅप गायन देखील केलं आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून हा चित्रपट प्रेरित आहे, हे या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य. रितिका आणि ऋतुजाचे चित्रपटातील लूक्स कथेतील उत्सुकता वाढवतायत तर आपल्या अभिनयातून भरत जाधव पुन्हा एकदा विनोदाची चौफेर फलंदाजी करताना दिसतायत.
गौरव मोरेनेही हास्याचे षटकार आपल्या सीन्समधून मारलेयत. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी भाजपचे प्रदेशिय चिटणीस श्रीकांत भारतीय हे शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. या चित्रपटाचे निर्माते अमित बसनेट, सुरेश गोविंदराय पै आणि आरोन बसनेट आहेत तर सह – निर्माते सानिस खाकुरेल आहेत. जालिंदर कुंभार यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे, तर सह – दिग्दर्शन वैशाली पाटील यांचे आहे. पटकथा – संवाद ओमकार मंगेश दत्त यांचे आहेत.
वैशाली सामंत, रोहित राऊत, वैष्णवी श्रीराम यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. साई – पियुष या जोडीनं बॅकग्राऊंड म्युझिक केलं आहे. चित्रपटाची गाणी मंदार चोळकर, मंगेश कांगणे आणि समीर सामंत यांनी लिहिली आहेत. चित्रपटात ऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री, माधुरी पवार, गौरव मोरे, निखील चव्हाण, ऋतुराज शिंदे आणि सुनील गोडबोले हे कलाकार आहेत. चित्रपटाचे डिस्ट्रिब्युशन फिल्मअस्त्रा स्टुडिओज करत आहेत.