टीम AM : 7 वी ते 10वी पास उमेदवारांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे मेगाभरती जाहीर करण्यात आलेली असून या भरतीची अधिसूचना जारी झाली आहे. त्यानुसार उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया उद्या म्हणजेच 17 नोव्हेंबर पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे.
रिक्त पदाचे नाव
1) लघुलेखक (निम्नश्रेणी) 05
2) लघुटंकलेखक 16
3) जवान राज्य उत्पादन शुल्क 568
4) जवान – नि – वाहन चालक 73
5) चपराशी 53
शैक्षणिक पात्रता
पद क्र. 1: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र. 2: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र. 3: 10 वी उत्तीर्ण
पद क्र. 4: (i) 07 वी उत्तीर्ण (ii) किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र. 5 : 10 वी उत्तीर्ण
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 डिसेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र
वयाची अट : 30 एप्रिल 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [ मागासवर्गीय : 05 वर्षे सूट ]
तुम्हाला किती पगार मिळेल ?
लघुलेखक (निम्नश्रेणी) – S – 15 : 41800 – 132300 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते.
लघुटंकलेखक – S – 8 : 25500 – 81100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते.
जवान, राज्य उत्पादन शुल्क – S – 7 : 21700 – 69100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते.
चपराशी – S – 1 : 15000 – 47600 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्तेे.