पतीच्या मृत्युनंतर कोसळली अभिनेत्री, सारं काही नीट सुरू असताना केली दुसरं लग्न करण्याची चूक

टीम AM : असे म्हटले जाते की प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे कोणती तरी वेदना दडलेली असते. मग तो सामान्य माणूस असो वा बॉलिवूड स्टार्स. स्टार्सचे आयुष्यही काही वेगळे नसते, आज आपण अशाच एका सुंदर अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत जिचा जन्म होताच तिच्या आईचे निधन झाले आणि दोन लग्न करूनही तिला जीवनात आनंद मिळू शकला नाही. आम्ही बोलत आहोत ते ‘द गर्ल नेक्स्ट डोअर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री विद्या सिन्हा यांच्याबद्दल. निरागस चेहरा, मोठे डोळे आणि गंभीर व्यक्तिमत्व. एक साधी आणि निष्पाप भारतीय मुलगी. या बुद्धिमान अभिनेत्रीने जेव्हा चित्रपटांच्या दुनियेत पाऊल ठेवले तेव्हा ती इतकी लोकप्रिय झाली की लोक तिला ‘रजनीगंधा’ म्हणू लागले. मुंबई सौंदर्य स्पर्धा जिंकून तिने मॉडेलिंगच्या दुनियेत प्रवेश केला आणि त्यानंतर हिंदी सिनेसृष्टीत धमाका केला. पण, सर्वकाही मिळूनही तिचा फक्त एकाच गोष्टीत पराभव झाला, तो म्हणजे प्रेम.

विद्या सिन्हा यांचा जन्म 1947 मध्ये मुंबईत झाला. त्यांचे वडील राणा प्रताप आणि आईचे बाबा (आजोबा) मोहन सिन्हा हे प्रसिद्ध चित्रपट निर्माते होते. असे असूनही विद्या यांना चित्रपटांमध्ये येण्यात कधीच रस नव्हता. विद्याच्या जन्मादरम्यानच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे पालनपोषण आईच्या घरीच झाले. आजोबांच्या घरी सगळीकडे चित्रपटांचे वातावरण होते, पण तरीही विद्या यांना अभिनय करण्याची इच्छा नव्हती. मात्र, अभ्यासातही त्यांचे मन लागत नव्हते.

प्रसिद्ध निर्माते – दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांनी विद्याला त्यांच्या ‘रजनीगंधा’ चित्रपटात घेण्यासाठी संपर्क साधला. तोपर्यंत विद्याने चित्रपटांमध्ये रस घेण्यास सुरुवात केली होती. रजनीगंधा या चित्रपटासाठी त्यांनी होकार दिला. मग काय होतं की आपल्या अभिनयाने त्यांनी चित्रपटाला इतका गंध लावला की, ते सर्वत्र ‘रजनीगंधा’ म्हणून ओळखले जाऊ लागले. चित्रपटाचे शीर्षक गीत दिवसातून अनेक वेळा रेडिओवर ऐकवले जायचे. यानंतर विद्या सिन्हाची तुलना त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री जया भादुरी आणि मौसमी चॅटर्जी यांच्याशी झाली होती.

यानंतर 1974 मध्ये ‘राजा काका’ हा चित्रपट आला, पण तो बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नाही. निर्माते बासू चॅटर्जी यांनी ‘रजनीगंधा’ सिनेमातील विद्या आणि अमोल पालेकर यांच्यासोबत ‘छोटी सी बात’ हा आणखी एक चित्रपट बनवला. विद्याने या चित्रपटात दमदार अभिनय करत बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवले. यानंतर विद्याने एकामागून एक चित्रपट साइन केले आणि तिची फॅन फॉलोइंग वाढतच गेली. 1970 मध्ये संजीव कुमार आणि शशी कपूर यांच्यासोबत आलेला तिचा ‘शक्ती’ चित्रपटही प्रेक्षकांना खूप आवडला होता.

विद्या लहान वयातच तिच्या शेजारी राहणाऱ्या वेंकटेश्वरन अय्यर या दक्षिण भारतीय ब्राह्मण मुलाच्या प्रेमात पडली होती. 1968 मध्ये तिने व्यंकटेश्वरन यांच्याशी विवाह केला. पतीच्या सांगण्यावरूनच तिने चित्रपटात प्रवेश केला आणि ‘रजनीगंधा’ चित्रपट साइन केला. 1989 मध्ये तिने ‘जान्हवी’ नावाची मुलगी दत्तक घेतली. सर्व काही ठीक चालले होते की अचानक विद्याच्या आयुष्यात वादळ आले. 1996 मध्ये विद्याच्या पतीचे आजारपणामुळे निधन झाले. त्यानंतर तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. कालांतराने तिच्या जखमा बऱ्या झाल्या आणि तिने आपल्या मुलीच्या संगोपनावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली.

पतीच्या मृत्यूनंतर चार वर्षांनी ती ऑस्ट्रेलियातील भारतीय वंशाचे व्यापारी नेताजी भीमराव साळोखे यांना भेटली. भीमरावांवर तिचा विश्वास खूप होता, त्यामुळे वयाच्या 54 व्या वर्षी तिने 2001 मध्ये भीमरावशी दुसरे लग्न केले आणि आपल्या मुलीसह ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे स्थायिक झाली, पण हीच तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली. प्रत्यक्षात भीमरावने पैशाच्या लालसेपोटी विद्याशी लग्न केल्याचे नंतर समोर आले. भीमराव विद्याकडे सतत पैशांची मागणी करत असे आणि तिच्यासोबत गैरवर्तन करत असे, ज्याची तक्रार विद्याने 2009 मध्ये पोलिसांकडे केली होती.

यानंतर विद्या भारतात परतली. पतीपासून विभक्त झाल्यानंतर तिला खूप एकटे वाटू लागले आणि तिची प्रकृतीही ढासळू लागली. मात्र, यादरम्यान मुलगी जान्हवीने तिला पुन्हा चित्रपटात काम करायला सांगितले, यानंतर विद्याने स्वत:ला सांभाळले आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली. ‘काव्यांजली’, ‘नीम नीम शहद शहद’, ‘इश्क का रंग सफेद’, ‘बहुरानी’, ‘कुबूल है’ आणि ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ हे तिचे काही खास टीव्ही शो होते, ज्यात तिने उत्कृष्ट अभिनय केला.

मात्र, दरम्यानच्या काळात त्यांची प्रकृती ढासळत राहिली. एके दिवशी त्यांना जुहू येथील रुग्णालयात दाखल करावे लागले. येथे डॉक्टरांनी सांगितले की तिला फुफ्फुसाचा आजार आहे. तिला 6 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आणि अखेर 15 ऑगस्ट 2019 रोजी तिने जगाचा निरोप घेतला.