टीम AM : दिवाळीनिमित्त बसस्थानकात प्रवाशांची गर्दी होत आहे. या गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी महिलेच्या बॅगमधील 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना दि. 9 रोजी दुपारी बारा वाजता येथील बसस्थानकात घडली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
अहमदपूर तालुक्यातील मावलगाव येथील महिला शितल रविशंकर भदाडे (वय 25) या आपल्या गावी जाण्यासाठी अंबाजोगाई बसस्थानकात आल्या होत्या. गावी जाणाऱ्या बसमध्ये चढत असतांना त्यांच्या बॅगमध्ये ठेवलेले 1 लाख 20 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. या प्रकरणी शितल भदाडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ननावरे करीत आहेत.