टीम AM : ‘स्वाराती’ वैद्यकीय महाविद्यालयातील लिपीक वैजनाथ काळे यांच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच अंबाजोगाई शहरातील मोबाईल व्यावसायिक शरद जयस्वाल यांनी आपल्या दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दिपावलीच्या पहिल्या दिवशी शहरातील दोन व्यक्तींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शरद जयस्वाल हे मुळ मुंबई येथील रहिवासी असून गेली अनेक वर्षापासून ते अंबाजोगार्ईत स्थायीक झाले होते. शहरातील पोलीस ठाण्यासमोरील नगरपरिषदेच्या गाळ्यात मोरया मोबाईल शॉपी या नावाने त्यांचे मोबार्ईल विक्री व दुरुस्तीचे दुकान होते. या व्यवसायासोबतच ते अधिकृत परवाना काढून खाजगी फायनान्स व बीसी चालवत असत. आज दुपारी दुकानात त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्या का केली ? याचे कारण अद्याप समोर आले नाही. सदरील घटनेची माहिती पोलीसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा अधिक तपास अंबाजोगाई शहर पोलीस करीत आहेत.