टीम AM : बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ अशी ओळख असणाऱ्या अभिनेत्री यांचा काल 75 वा वाढदिवस होता. हेमा मालिनी यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रँड पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. हेमा मालिनी यांच्या बर्थ – डे पार्टीमधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
नुकताच अभिनेत्री रेखा आणि हेमा मालिनी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये या दोघी ‘क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रेखा आणि हेमा मालिनी या स्टेजवर ‘क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो’ या गाण्यावर डान्स करत आहेत. हेमा मालिनी यांनी बर्थ – डे पार्टीसाठी पिंक कलरची नेटची साडी आणि सिल्वर कलरच्या ज्वेलरी असा लूक केला होता. तर रेखा यांनी व्हाईट कलरची साडी, गोल्डन कलरची ज्वेलरी आणि हातात व्हाईट पर्स असा लूक केला होता. या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.