ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या : ‘रिपाई’ चा विराट मोर्चा

टीम AM : ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा. या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 17 ऑक्टोबरला केज शहरात ‘रिपाई’ चा भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो ‘रिपाई’ कार्यकर्त्यांसह नागरिक सहभागी झाले होते. 

‘रिपाई’ तर्फे विविध मागण्यांसाठी केजमध्ये हा मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली आणि हा मोर्चा छत्रपती संभाजी महाराज चौक, बस स्टँड, कानडी चौक, कळंब चौक मार्गे तहसील कार्यालयावर धडकला. 

‘या’ आहेत मागण्या

बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, 1990 च्या गायरान जमिनी नियमाकुल करण्याच्या शासनाच्या निर्णयाला 2005 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. जिल्हा परिषद शाळांचे करण्यात येणारे खाजगीकरण रद्द करण्यात यावे व विद्यार्थी पटसंख्येची अट रद्द करून ज्या त्या शाळांवर शिक्षक नियुक्त करण्यात यावे. शहरातील झोपडपट्टी वासियांना कबाला पावत्या देण्यात याव्यात. केज तालुक्यातील दलित बांधवांना स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी. राज्य शासनाकडून विविध कार्यालयात करण्यात येणारी कंत्राटी भरती प्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.