श्री सरस्वती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

अंबाजोगाई : येथील माईर्स एमआयटीच्या श्री सरस्वती पब्लिक स्कूल नागझरीच्या सहा विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली असून ते सहाही विद्यार्थी रत्नागिरी येथे होणाऱ्‍या स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत.

या विद्यार्थ्यांनी तालुका,जिल्हा व विभागीय पातळीवर घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांची निवड आता राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. रत्नागिरी येथे होणाऱ्‍या या स्पर्धेसाठी १४ ते १७ वयोगटातील शंकर गाडगे, योगेश्वरी मुंडे, प्रणव महाजन, शैलेश पाटील, साक्षी टार्फे, शिवानी पुयड यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना क्रिडा प्रशिक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल विश्वशांती केंद्र आळंदीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ.विश्नाथ कराड, संस्थेचे कार्यकारी संचालक राजेश कराड, प्राचार्य बी. संगप्पा, शिक्षक व कर्मचाऱ्‍यांनी खेळाडूंचे स्वागत केले आहे.