मोफत औषधांचेही केले वाटप
अंबाजोगाई : येथील रोटरी क्लब, इंडियन मेडिकल असोसिएशन व योगेश्वरी डायबेटिस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मधुमेह शिबीरात दीड हजार रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना औषधेही देण्यात आली. मधुमेहावरील पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले व रुग्णांना मोफत पुस्तिका देण्यात आल्या.
सुरुवातीला सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चिक्षे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पुंडलिकराव पवार होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.राजेश इंगोले, डॉ.श्रीनिवास रेड्डी, डॉ.सचिन पोतदार, डॉ.विजय लाड, प्रा.सचिन कराड यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
प्रसाद चिक्षे म्हणाले, ताणतणाव दूर ठेऊन वाटचाल करावी. बालकासारखे मन प्रसन्न ठेवावे. नियमित व्यायाम व आहारावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. डॉ. अतुल शिंदे म्हणाले, बदलत्या जीवनशैलीमुळे सर्वत्र मधुमेहाचे प्रमाण झपाटयाने वाढत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना केली पाहिजे. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे स्थानिक अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले, डॉ.श्रीनिवास रेड्डी, शेख सोफी, पुंडलिकराव पवार यांचीही समोयोचित भाषणे झाली. नियमित व्यायाम करून वेळेवर ऑषोधपचार घेणाऱ्या रुग्णास देण्यात येणारा “पेशंट ऑफ द इयर पुरस्कार” शेख सोफी यांना देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप गौरव चिन्ह,शाल व पुष्पहार होते.
शिबीरात रुग्णांचा रक्तदाब, किडणी तपासणी, चरबीचे प्रमाण, पायांच्या नसाची तपासणी, इसीजी, साखरेची तीन महिन्याची तपासणी करण्यात आली. सुरुवातीला मुख्य संयोजक डॉ.अतुल शिंदे यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा सत्कार कासिम पटेल, रणजित मंगे, डॉ.दामोधर थोरात, अॅड.अनंतराव जगतकर, डॉ.सुरेश आरसुडे, डॉ.निशिकांत पाचेगावकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश जाजू व एस. के. निर्मळे यांनी केले.शेवटी प्रा. सचिन कराड यांनी सर्वांचे आभार मानले.