हृदयद्रावक : तलावातील पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू, अंबाजोगाई जवळ घडली घटना

टीम AM : अंबाजोगाई शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अंबासाखर – लोखंडी सावरगाव महामार्गावर एक हृदयद्रावक घटना घडली आहे. कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन कुटुंबातील मुला – मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना आज दुपारी 1 वाजताच्या दरम्यान घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

अंबासाखर कारखाना – लोखंडी सावरगाव महामार्गावरील नवीन प्रस्तावित उपप्रादेशिक परिवहन कार्यालयालगत असलेल्या तलावात अंबासाखर कारखाना परिसरातील दोन कुटूंब कपडे धुण्यासाठी आज दुपारी (दि.5) गेले होते. कपडे धुताना अश्‍विनी लहु जाधव (वय 10) ही मुलगी पाण्यात बुडू लागल्याने रोहित परमेश्‍वर चव्हाण (वय 16) या तरूणाने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतू, तिला वाचविण्याच्या नादात मुलाला स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. दोन्ही लेकरांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस करित आहेत.